Samajdin पाटोदा जनता विद्यालयात उत्साहात ‘समाजदिन’ साजरा; ‘जमी से शिखर तक का सफर’मधून मविप्रचा गौरवशाली इतिहास उलगडलापाटोदा जनता विद्यालयात उत्साहात मविप्र ‘समाजदिन’ साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर स्वर्गीय रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिवसानिमित्त बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी येवला तालुक्यातील जनता विद्यालय, पाटोदा येथे ‘समाजदिन’ मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व समाजधुरिणांच्या त्यागाचे आणि कार्याचे स्मरण करून त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात भगव्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहणाने झाली. Samajdin मविप्र समाज संस्थेचे ज्येष्ठ सभासद तथा माध्यमिक विभागाचे अध्यक्ष मा. श्री. कारभारी पाटील बोरणारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यालयाच्या कलामंचच्या विद्यार्थ्यांनी मविप्र संस्थेचे अधिकृत समाजगीत “जनकल्याणी देह झिजवूनी लाजविले चंदना…” हे गीत सादर केले.

कर्मवीरांच्या प्रतिमांना अभिवादन
मुख्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता तसेच मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर अँड. बाबुराव ठाकरे, कर्मवीर अँड. विठ्ठलराव हांडे आणि कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.Samajdin https://www.google.com/search?q=samajdin+mavipr+samaj+karykram&rlz=1C1OZZY_enIN1135IN1135&oq=samajdin+mavipr++samaj+karykram&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOTIHCAEQIRiPAjIHCAIQIRiPAtIBCTEzODA0ajBqN6gCALACAA&sourceid=chrome&source=chrome.ob&ie=UTF-8
‘जमी से शिखर तक का सफर’मधून संस्थेचा इतिहास
विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाखले यांनी प्रास्ताविकातून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा संघर्षमय आणि गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. ‘जमी से शिखर तक का सफर’ या संकल्पनेतून संस्थेच्या उभारणीसाठी अनेक कर्मवीरांनी केलेल्या त्यागाचे आणि योगदानाचे त्यांनी स्मरण केले.Samajdin
कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली शिक्षणाची ही चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असून, विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे आणि देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्य पाखले यांनी केले.https://udtamaharashtra.com/
वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग
समाजदिनाचे औचित्य साधून विद्यालयात वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेच्या लहान गटात इयत्ता सातवी ‘अ’ मधील दिव्या भाऊसाहेब पाचपुते हिने प्रथम, शुभम भाऊराव नाईकवाडी याने द्वितीय तर इयत्ता सहावी ‘ब’ मधील शिवानी शरद जाधव हिने तृतीय क्रमांक मिळवला.
मोठ्या गटात इयत्ता आठवी ‘ब’ मधील कु. अमृता धनंजय बोरनारे हिने ‘ए.आय. – शाप की वरदान’ या विषयावर प्रभावी विचार मांडले. यापूर्वी कसबे सुकेणे, ता. निफाड येथे झालेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेतही तिने या विषयावर उत्कृष्ट भाषण सादर केले होते.
विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री. एन. व्ही. गाडे यांनी शिक्षक मनोगतातून कर्मवीरांनी घडवलेल्या शैक्षणिक चळवळीचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मता आणि मविप्र संस्थेच्या गौरवावर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून ११ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश
समाजदिनाच्या निमित्ताने विद्यालयात ‘एक हात मदतीचा’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या ११ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आत्मविश्वासाने सहभागी होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
समाजदिनानिमित्त विद्यालयात सलग तीन दिवस विविध मैदानी क्रीडा आणि फनी गेम्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, रस्सीखेच, स्लो सायकलिंग, लिंबू-चमचा यांसह विविध मनोरंजक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंसह वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शाळा हे केवळ शिक्षण घेण्याचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा, कला आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असे आवाहन करण्यात आले.
शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियोजनातून कार्यक्रम यशस्वी
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री. पी. पी. भड यांनी केले. इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. एफ. बी. चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. संगीत शिक्षक श्री. एस. डी. नवगिरे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. एम. शेळके, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. एस. डी. नवगिरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला मविप्रचे माध्यमिक विभागाचे अध्यक्ष मा. श्री. कारभारी पा. बोरणारे, उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष मा. श्री. मारुती पा. घोरपडे, अभिनव बालविकास अध्यक्ष मा. श्री. तुकाराम पा. बोराडे, ज्येष्ठ सभासद श्री. रमेशकाका बोरनारे, श्री. ए. बी. पाटील, माजी मुख्याध्यापक श्री. सचिनभाऊ भोकनळ, मविप्र सभासद श्री. अण्णाभाऊ पा. दौंडे, श्री. शशिकांत नाईकवाडी, श्री. रमतुल्ला चौधरी, श्री. शिवराम काका बोरणारे, श्री. समाधान मिटके, श्री. अशोक पगारे आणि श्री. अशोक बोराडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.सौजन्य : श्री. महेश पाटील सर जनता विद्यालय, पाटोदा, ता. येवला, जि. नाशिक(प्रसिद्धी समिती प्रमुख)
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




