Tukaram Mundhe : FDA ची राज्यभर धडक कारवाई! 431 आस्थापनांवर छापे; 29.11 कोटींचा 22 लाख किलो संशयित अन्नसाठा जप्त

Tukaram Mundhe : FDA ची राज्यभर धडक कारवाई! 431 आस्थापनांवर छापे; 29.11 कोटींचा 22 लाख किलो संशयित अन्नसाठा जप्त

“सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र” या संकल्पनेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA)Tukaram Mundhe विभागाने राज्यभर मोठी धडक कारवाई केली आहे. आरोग्यास अपायकारक, अस्वच्छ वातावरणात तयार होणारे अन्नपदार्थ, भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी करून मोठ्या प्रमाणात संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र हॉटेल व रेस्टॉरटची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिक विभागात दोन दिवस विविध हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली. या काळात एकूण २० हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

431 आस्थापनांची तपासणी

Tukaram Mundhe 25 मे ते 24 जून या कालावधीत मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 431 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात आली.

29.11 कोटींचा अन्नसाठा जप्त

या कारवाईदरम्यान 22 लाख 4 हजार 182 किलो संशयित आणि दर्जाहीन अन्नसाठा जप्त करण्यात आला. Tukaram Mundheजप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 29 कोटी 11 लाख 85 हजार 330 रुपये इतकी असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

कोणते पदार्थ जप्त करण्यात आले?

कारवाईदरम्यान खालील अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला:

  • आंबे
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ
  • तयार फळांची पेये
  • रंगमिश्रित सुपारी
  • चहा पावडर
  • पिण्याचे पाणी
  • खवा
  • बेकरी पदार्थ
  • कँडी
  • गूळ
  • खाद्यतेल
  • तूप
  • खजूर
  • आईस्क्रीम
  • कुल्फी
  • फ्रोजन डेझर्ट
  • मसाले
  • भेसळीसाठी वापरण्यात येणारे विविध पदार्थhttps://www.loksatta.com/nashik/tukaram-mundhe-fda-action-nashik-hotels-license-suspended-hygiene-violations-hsp-89-5998318/

प्रयोगशाळेत नमुने पाठविले

Tukaram Mundhe जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

अस्वच्छ उत्पादन प्रक्रियेवरही कारवाई

Tukaram Mundhe या मोहिमेदरम्यान केवळ भेसळयुक्त अन्नपदार्थच नव्हे तर अत्यंत अस्वच्छ वातावरणात उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिराती करणाऱ्या व्यावसायिकांनाही नोटिसा देण्यात आल्या.https://udtamaharashtra.com/

ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सुरक्षित, दर्जेदार आणि कायदेशीर निकष पूर्ण करणारे अन्न नागरिकांपर्यंत पोहोचावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

व्यापाऱ्यांना इशारा

FDA ने अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. Tukaram Mundhe नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

NASHIK NEWS
NASHIK NEWS

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

  • पॅकबंद अन्नपदार्थ घेताना उत्पादन व कालबाह्यता तारीख तपासा.
  • FSSAI परवाना क्रमांक तपासा.
  • संशयास्पद किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास त्वरित FDA कडे तक्रार करा.
  • स्वच्छ आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच अन्नपदार्थ खरेदी करा.

प्रशासनाची कठोर भूमिका… नागरिकांच्या फायद्याची

लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे तरच हि मोहीम योग्नाय होईल .गरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र हॉटेल व रेस्टॉरटची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिक विभागात दोन दिवस विविध हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी करण्यात आली. या काळात एकूण २० हॉटेल व खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. राज्यात सुरक्षित अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी Tukaram Mundhe अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेली ही विशेष मोहीम महत्त्वाची ठरत आहे. 431 आस्थापनांवर कारवाई करून तब्बल 29.11 कोटी रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आल्याने भेसळ करणाऱ्यांवर मोठा धाक निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा मोहिमा भविष्यातही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *