MPSC कडून 1884 पदांची जाहिरात प्रसिद्ध , गट ‘क’ पदभरतीसाठी अर्ज सुरू; संपूर्ण माहिती येथे बघा!! – MPSC Group C Recruitment 2026
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी –महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 1884 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2026 आहे. तसेच या भरतीची परीक्षा कशी होणार,MPSC 1884 Vacancy 2026 अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल संपूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील विविध गट-क संवर्गांसाठी आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ करीता जाहिरात क्रमांक १२४/२०२५ दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून पूर्व परीक्षा दिनांक ११ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त/सुधारित मागणीपत्रांनुसार प्राप्त पदांचा/संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेत समावेश करण्यासाठी दिनांक २५ मार्च, २०२६, दिनांक २९ एप्रिल, २०२६ व दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सदर संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल दिनांक ०४ मे, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १२ जुलै, २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.MPSC Group C Recruitment 2026
mpsc-group-c-recruitment-2026-1884-vacancy
MPSC ग्रुप सी भरती २०२६
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
पद संख्या – 1884 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)MPSC 1884 Vacancy 2026
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा – १९ ते ४३ वर्ष
अर्ज शुल्क –
अमागास – रु. 544/-
मागासवर्गीय- रु.344/-
महाराष्ट्र भरती
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 जून 2026
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
| Activity | Start Date | End Date |
| Online Application Period | May 21, 2026 (14:00) | June 04, 2026 (23:59) |
| Last Date for Online Fee Payment | — | June 04, 2026 (23:59) |
| Last Date to Generate SBI Challan | — | June 06, 2026 (23:59) |
| Last Date for Cash Payment (Bank) | — | June 08, 2026 |
| Department | Post Name | Number of Posts |
| Industry, Energy & Labour Dept. | Industry Inspector | 09 |
| Finance Department | Tax Assistant | 73 |
| Finance Department | Technical Assistant | 04 |
| Home Department | Sub-Inspector (State Excise) | 125 |
| Various Government Depts. | Clerk-Typist | 1,673 |
| Total Vacancies | 1,884 | |
Educational Qualification For MPSC Group C Mains Exam Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| उद्योग निरीक्षक | (अ) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा (ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. |
| कर सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
| तांत्रिक सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. |
| दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. |
| लिपिक-टंकलेखक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |

Health Physical Standard For MPSC Group C Mains Exam 2025
Important Instruction For MPSC Group C Mains Exam Notification 2025
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 जून 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MPSC गट-क परीक्षा
How to Apply For MPSC Group-C Mains Bharti 2026
- आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MPSC Group C Bharti 2026 :महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी जाहिरातीद्वारे एकूण ९३८ रिक्त पदे विज्ञात करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरी शासन सुधारित/अतिरिक्त अधिकारपत्र प्राप्त करून राज्य शासनाच्या संबंधित विभागांच्या अधिकारात बदल/वाढीव गुंतवणूक आहे, असे जाहिराती परिच्छेद ४.२ नुसार स्पष्ट करण्यात आले होते. राज्य सरकारच्या विविध विभागासाठी प्राप्त / सुधारित विधानानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ सदस्यांच्या विविध संचालिका एकूण १७४१ पदव्या सुधारित निकाल २०२, २५६, शुध्दी पत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. या शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या दिनांक २८ एप्रिल, २०२६ रोजी पत्रान्वये प्राप्त अभिप्राय क्युनिका नियमानुसार दिनांक एप्रिल, २०२६ रोजीच्या शुधिपत्रकानुसार बेलिफ-लिपिक संवर्गाची एकूण ०३ पदे रद्द करण्यात आली आहेत. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ मधून विविध संवर्गाच्या एकूण १८८४ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. मूळ जाहिरातीमधील तसेच दिनांक २५ मार्च, २०२६ व २९ एप्रिल, २०२६ रोजीच्या शुध्दिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.


