नाशिक ते हरियाणा… NEET पेपरफुटीचं धक्कादायक कनेक्शन समोर

नाशिक ते हरियाणा… NEET पेपरफुटीचं धक्कादायक कनेक्शन समोर; कोण आहे या रॅकेटचा मास्टरमाईंड?

 

भारतातील असंख्य विद्यार्थ्यांचे स्वप्न व देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या NEET-UG 2026 परीक्षेभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे अखेर NTA ला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक ते हरियाणापर्यंत मोठं रॅकेट सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नाशिकमधून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये समोर आली. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली आणि तिथे तिचे अनेक सेट तयार करण्यात आल्याचा संशय आहे. पुढे हे पेपर बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे तपासातून उघड होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे परीक्षा सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशभरातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि आता त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.https://www.jagran.com

गेस पेपर मधून फुटला मोठा धागा

राजस्थान SOG च्या तपासात एक “गेस पेपर” समोर आला होता. या पेपरमधील तब्बल 100 हून अधिक प्रश्न मूळ NEET परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा पेपर परीक्षेच्या अनेक दिवस आधी विद्यार्थ्यांमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच तपास यंत्रणांना मोठा संशय आला आणि चौकशीचा फेरा राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि हरियाणापर्यंत पोहोचला.

कोण आहे मास्टरमाईंड?

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, जयपूरमधील मनीष नावाच्या व्यक्तीवर या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काही अहवालांमध्ये देहरादूनमधून राकेश कुमार नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्याचेही सांगितले गेले आहे. मात्र अधिकृतरीत्या तपास सुरू असल्याने अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

सोशल मीडियावर पेपर विक्री?

तपास यंत्रणांना WhatsApp आणि Telegram सारख्या माध्यमांद्वारे प्रश्नपत्रिका किंवा “गेस पेपर” लाखो रुपयांत विकण्यात आल्याचा संशय आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याचीही माहिती समोर आली आहे.

NTA वर प्रश्नांचा भडिमार

या प्रकरणानंतर NTA आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रम

परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली होती. आता पुन्हा परीक्षा होणार का, नवी तारीख कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. NTA लवकरच नव्या परीक्षेबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ संभ्रम असला तरी विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या वेब पेजला भेट द्या udtamaharshtra.comhttp://udtamaharshtra.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *