“शिक्षण हाच विकासाचा पाया” – १८० गुणवंत विद्यार्थ्यांचा मणियार समाजातर्फे सन्मान, समाजात उत्साहाचे वातावरण

मणियार समाजातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात; १८० विद्यार्थ्यांचा सन्मान, शिक्षण क्षेत्रातील यशाचा जल्लोष

नाशिक |उडता महाराष्ट्र प्रतिनिधी.

समस्त मणियार जमात, नाशिक यांच्या वतीने इयत्ता दहावी, बारावी, विविध पदवी अभ्यासक्रम तसेच सरकारी सेवेत रुजू झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. नाशिक येथील उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सोहळ्यात दहावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे, बारावीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आदी पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रथम श्रेणी मिळविणारे विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, विधी शिक्षण तसेच एमपीएससीद्वारे सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि पदक देऊन गौरविण्यात आले. एकूण 180 विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग, मुंबईचे डेप्युटी कमिशनर असीर चांदभाई शेख (IRS), फार्मा विभागाचे जनरल मॅनेजर सरफराज मनेर, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अखलाख अहमदभाई शेख, मोटिव्हेशनल काऊन्सिलर आशिष शेख, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील डेप्युटी इंजिनिअर आसिफ हाजी पीर मोहम्मद मणियार, खातून एज्युकेशन सोसायटी, मालेगावचे चेअरमन शेख रिजवान अब्दुल मुतालीब, के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिका मरियम एजाज मणियार, समस्त मणियार जमात नाशिक महाराष्ट्रचे अध्यक्ष हाजी उस्मान हाजी इस्माईल मणियार तसेच उपाध्यक्ष शकीलभाई बनिया मणियार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष असीर शेख (IRS) यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती कितीही मोठ्या अडचणींवर मात करून यशाचे शिखर गाठू शकते, असा संदेश दिला. निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेत आयआरएस अधिकारी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

मणियार समाजातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे प्रमाण पाहून ते विशेष भारावून गेले. विद्यार्थ्यांपैकी आयशा मणियार यांनी प्रभावी आणि प्रेरणादायी मनोगत व्यक्त करून उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष उस्मानभाई मणियार, उपाध्यक्ष शकीलभाई मणियार, निसारभाई मणियार, खालीदभाई मणियार, हबीबभाई मणियार, हाजी रशीदभाई मणियार, राजूभाई मणियार, मतीनभाई मणियार, डॉ. राजू मणियार, रियाजभाई मणियार (राजूर), ताहीरभाई मणियार (मोखाडा), नसीर रौफ मणियार, इम्रानभाई मणियार, युसूफ मणियार, अजहरभाई मणियार, इर्शादभाई मणियार, नईम सर मणियार, आबरार सर मणियार, रियाज सर मणियार, बिलाल सर मणियार तसेच प्रस्ताविक करणारे नसीर सर मणियार यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा गुणगौरव सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *