पुणे–मुंबई “मिसिंग लिंक” रस्त्यावर बेफिकीरपणा महागात! पोलिसांचा इशारा

पुणे–मुंबई “मिसिंग लिंक” रस्ता:

महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित असा मिसिंग लिंक प्रकल्प एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त चर्चेत असलेल्या प्रकल्पाचं लोकापर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही या मिसिंग लिंकचं उद्घाटन केलं. जवळपास 6695 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मिसिंग लिंकमुळे 6 किमीचं अंतर कमी होणार असून प्रवाशांची 30 मिनिटांची बचतही होणार आहे.हा नवीन मार्ग मुंबईहून खोपोली लोणावळ्याजवळ असलेल्या कुसगावला जोडतो. हा मार्ग सुरु झाल्यानंतर जुन्या घाट सेक्शनमधील जवळपास 70 टक्के ट्रॅफिक डायव्हर्ट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे पुन्हा मुंबई असलेली वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल अशी आशा आहे.

नेमकी समस्या काय आहे?

सध्या “मिसिंग लिंक” काम पूर्ण झालेले असून या मार्गावर कोणत्याही वाहनचालकांनी थांबायचे नाही तरीही काही वाहन  रस्त्यावर थांबत असतात. बेफिकीरपणामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

👮‍♂️ पोलिसांची कडक भूमिका

महामार्ग पोलिसांनी अलीकडेच विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत:

नियम मोडणाऱ्या अनेक वाहनचालकांना दंड

गंभीर प्रकरणांमध्ये वाहन जप्त

वारंवार नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई

पोलिसांचा स्पष्ट इशारा आहे — “मिसिंग लिंक रस्त्यावर थांबणे  म्हणजे जीव धोक्यात घालणे.”

महामार्ग पोलिसांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत अनेक वाहनचालकांना दंड करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये वाहन जप्त करण्याचीही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे की, मिसिंग लिंक रस्त्यावर रात्रीचे थांबणे  अत्यंत धोकादायक आहे.”विशेषतः रात्रीच्या वेळी या भागात अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अपूर्ण रस्ते, वळणे आणि कमी प्रकाश यामुळे धोका वाढतो. तरीही काही जण वेगाने वाहन चालवतात किंवा नियमांकडे दुर्लक्ष करतात, ही बाब चिंतेची आहे रस्त्यावर गाडी थांबवणे चुकीचे आहे याबाबत जनजागृती करण्यात आली आहे..

प्रकल्पाचे फायदे

“मिसिंग लिंक” सुरू झाल्यानंतर:

पुणे–मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल .घाटातील धोकादायक वळणं टाळली जातील .वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल. म्हणून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी वाहन चालकांनी प्रशासनास व पोलिसांनी योग्य  मदत केली पाहिजे व आपली वाहने मिसिंग लिंक वर रस्त्यावरती  न थांबवता प्रवास करायला हवा यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल व पुणे मुंबई रस्त्यावरती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *