PoCRA AI फिल्ड असोसिएट (PoCRA AI प्रकल्प)
संस्था: TIH, IIT Bombay
पद: फील्ड असोसिएट (Field Associate)
शैक्षणिक पात्रता: कृषी पदविका (Diploma in Agriculture) / बी.एस्सी. (कृषी)
कार्यस्थळ:राहुरी, परभणी, दापोली
कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी
PoCRA AI निवड झालेल्या उमेदवारांना उन्हाळी हंगामात TIH – IIT Bombay, मुंबई येथे काही कालावधीसाठी काम करण्याची आणि आधुनिक AI आधारित कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल.
कामाचे स्वरूप
- शेतस्तरावर डेटा संकलन करणे आणि पिकांवरील रोग व किडींची अचूक ओळख करणे.
- उच्च दर्जाचा डेटासेट तयार करण्यासाठी शासनाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह तसेच TIH च्या AI/ML टीमसोबत समन्वय साधणे.
प्रमुख जबाबदाऱ्या
- आवश्यकतेनुसार एका उपविभागातील ३–४ तालुक्यांमध्ये आणि १०–१५ पिकांमध्ये डेटा संकलन करणे. PoCRA AIप्रकल्पाच्या गरजेनुसार जिल्ह्यातील इतर उपविभागात बदली होऊ शकते.
- मोबाईल फोनद्वारे SOP नुसार दररोज ५००–८०० उच्च दर्जाची छायाचित्रे (निरोगी तसेच रोगग्रस्त/किडग्रस्त पिकांची) संकलित करणे.PoCRA AI
- छायाचित्रांसोबत पीक, रोग/कीड, स्थान आणि दिनांक यांची माहिती व्यवस्थित अपलोड करणे.
- कृषी सहाय्यक, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी (TAO) आणि तंत्रज्ञान समन्वयक यांच्यासोबत समन्वय साधून विविध पिकांचा डेटा संकलित करणे.
- संकलित डेटाची गुणवत्ता, सुसंगतता आणि योग्य साठवण सुनिश्चित करणे.
- AI मॉडेल विकसित करणाऱ्या टीमला शेतातील निरीक्षणे उपलब्ध करून देणे.
- PDI आणि ETL संबंधित माहिती संकलनासाठी आवश्यक सहाय्य करणे.
वेतन
₹२५,००० ते ₹३०,००० प्रति महिना (प्रवास खर्च, TA/DA सहित).
अर्ज कसा करावा?
आपला बायोडाटा खालील ई-मेलवर पाठवा:
ई-मेल विषय (Subject): Field Associate – आपले नाव
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ५ जुलै २०२६
- संभाव्य रुजू होण्याची वेळ: जुलै अखेर / ऑगस्ट २०२६ च्या सुरुवातीस



